जगभरातील आपल्यापैकी अनेकजण घरातच अडकले आहेत, वेळ घालविण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. यातच गूगल ने डूडल सर्व्हिस च्या माध्यमातून पुढील दोन आठवड्यासाठी लोकप्रिय खेळ आपल्या कॉम्पुटर, मोबाईल, टॅब वर खेळण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
क्रिकेट हा सर्व भारतीयांचा आवडता खेळ आहे त्यातच गूगल क्रिकेट चा खेळ आपल्या सर्वांसाठी घेऊन आले आहेत.